राणेंना भेटल्यानंतर मुख्यमंत्री अहमदाबादमध्ये, अमित शहांशी केली चर्चा, राजकीय घडामोडींना वेग !

राणेंना भेटल्यानंतर मुख्यमंत्री अहमदाबादमध्ये, अमित शहांशी केली चर्चा, राजकीय घडामोडींना वेग !

मुंबई – माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काल संध्याकाळी 6 वाजता वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीबाबत नारायण राणे यांच्याकडून दुजोरा देण्यात आला आहे. मात्र या भेटीचा तपशील कळू शकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या सात तारखेला होणारी विधान परिषद निवडणूक आणि राणेंचा संभाव्य मंत्रिमंडळातील समावेश याबद्दल चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

नारायण राणे यांना संध्याकाळी 6 वाजता भेटल्यानंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट अहमदाबाद गाठलं. त्या ठिकाणी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत राणेंसोबत झालेल्या भेटीतील वृत्तांत त्यांना सांगितल्याचं बोललं जातंय. तसंच विधान परिषदेच्या निवडणुकीतील रणनितीबाबतही शहा यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केल्याचं कळतंय. दरम्यान नारायण राणे यांनी कालच्या भेटीबाबत बोलण्यास नकार दिला असला तरी ते लवकरच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

COMMENTS