मुंबई – उरणमध्ये राष्ट्रावदी काँग्रेसनं जाहीर मेळाव्याचं आयोजन केलं होतं. या मेळाव्याला राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेत आणि माजी मंत्री सुनील तटकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. नाकार्ते सरकार जेव्हा जेव्हा चुकीचे वागेल तेव्हा तेव्हा राज्यात हल्लाबोल मोर्चा निघणार असल्याचं तटकरे म्हणाले आहे. उरणचा विकास हा पवार साहेब मुख्यमंत्री असातनाच झाला असून त्यांच्याच कारकीर्दीत जेएनपीटी या महत्वकांक्षी प्रकल्पाची सुरुवात झाली असल्याचं तटकरे म्हणाले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बांधिलकी लोकांशी आहे, या पक्षाचा जन्म राजकारणासाठी नाही तर लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी झाला असल्याचंही तटकरे यांनी म्हटलं आहे.
शरद पवार साहेबांनी नेहमी प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा निर्णय घेतला. हे सरकार फक्त काही उद्योगपत्यांसाठी निर्णय घेत आहे. शेतकरी, कामगार सर्वच दुःखी आहेत. अनेकांत बेरोजगार होण्याची भीती निर्माण झाली आहे. ट्रास्पोर्टेशन कायदा बदलल्याने अनेकांचे नुकसान होणार असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला.
आज #उरण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जाहीर मेळाव्यास संबोधित केले. उरणचा विकास मा. @PawarSpeaks साहेब यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत झाला. जेएनपीटी या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात याच कालावधीत झाली होती. pic.twitter.com/fRR9kgsBpH
— Sunil Tatkare (@SunilTatkare) December 29, 2017
COMMENTS