नवी दिल्ली – राष्ट्रीय समाज पक्षाचा 15 वा वर्धापन दिन दिल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या सोहळ्याला पक्षाध्यक्ष महादेवजी जानकर केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, हंसराज अहिर, गिरीराज सिंग, राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंडे, पक्षाचे नेते बालासाहेब दोडतले, विकास माहात्मे, सुरेश दादा बंडगर यांच्यासह राज्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान रासप हा अठरा पगड जाती जमातीला सोबत घेवून काम करणारा पक्ष असून भाजपच्या सत्ता परिवर्तनाच्या लढाईत त्यांचे मोलाचे योगदान ठरले आहे. या पक्षाचे भविष्य अतिशय उज्ज्वल आहे अशा शब्दांत राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री ना पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रीय समाज पक्षाला त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे माझे बंधू आहेत, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पश्चात आमचे बहिण-भावाचे नाते अतूट असं आहे, मुंडे साहेबांच्या संघर्षाच्या लढाईतून आम्ही खूप कांही शिकलो, त्यांनी दाखविलेल्या साहस आणि संयमाच्या मार्गावर वाटचाल करत पुढे जात असल्याचे ना. पंकजाताई मुंडे म्हणाल्या. तसेच रासपने माझा घोंगडी व काठी देवून केलेला सत्कार हा साहस व आपल्या सारख्या तमाम बांधवांच्या प्रेमाचे प्रतिक आहे असंही पंकजा मुंडे यांनी यावेळी म्हटलं आहे.
COMMENTS