उस्मानाबाद – उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात शिवसेनेनं तिकीट नाकारल्यानंतर प्रथमच विद्यमान खासदार प्रा. रवींद्र गायकवाड यांनी नाराजगीवर प्रतिक्रिया दिली आहे. पक्षाने दिलेला आदेश पाळणार असून बंडखोर बसवराज वरनाळे यांनीही माघार घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पक्षादेश पाळणारा कार्यकर्ता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. शिवसेनेकडून उस्मानाबादमध्ये ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे खासदार गायकवाड समर्थक वरनाळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे वरनाळे यांनी अर्ज मागे घेतला असल्याचं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
COMMENTS