अबब… देशातल्या एक टक्के लोकांककडे 73 टक्के संपत्ती !

अबब… देशातल्या एक टक्के लोकांककडे 73 टक्के संपत्ती !

मुंबई – देशभरातल्या एक टक्के लोकांकडे 73 टक्के संपत्ती असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑक्सफॅम या आंतरराष्ट्रीय संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. तसेच जगभरात ही स्थिती आणखी भयावह असून 1 टक्के लोकांकडे 82 टक्के संपत्ती आहे. या सर्व्हेवरुन देशातला गरीब नागरिक हा गरीब बनत असून श्रीमंत हे श्रीमंतच होत असल्याचं दिसून येत आहे.

स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये होत असलेल्या विश्व आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये 37 टक्के अब्जाधीशांना वारसाहक्काने संपत्ती लाभली असून अब्जाधीशांकडच्या एकूण संपत्तीपैकी 51 टक्के रक्कम ‘या’ श्रीमंतांकडे आहे. देशातील एकूण लोकसंख्येपैकी 73 टक्के संपत्ती ही फक्त 1 टक्के श्रीमंतांच्या भोवती केंद्रित आहे. तर दुसरीकडे लोकसंख्येच्या 50 टक्के असलेल्या गरिबांची संपत्ती फक्त काही टक्क्यानं वाढली आहे.

2018 ते 2022 या कालावधीत देशात 70 लक्षाधीश होतील, असंही अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. 101 अब्जाधीशांपैकी 51 जणांनी वयाची 65 वर्षं पूर्ण केली असून त्यांच्याजवळ एकूण 10 हजार 544 अब्ज रुपये एवढी संपत्ती आहे. येत्या 20 वर्षांत ही रक्कम त्यांच्या वारसांकडे गेल्यास त्यांना 30 टक्के दराने वारसा कर लावला जाणार आहे. या धक्कादायक आकडेवारीमुळे देशातील आर्थिक स्थिती समोर आली आहे.

COMMENTS