मुंबई – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाची आज महत्वाची बैठक पार पडणार आहे. पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीला पक्षाचे राज्यातले सर्व प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत भीमा कोरेगाव येथील घटना आणि त्यांचे राज्यभर उमटलेले पडसाद यावर सविस्तर चर्चा केली जाणार आहे.
भीमा कोरेगाव घटनेनंतर भारिप नेते प्रकाश आंबडेकर यांचं राजकीय वजन वाढल्यानं रिपाईतील आठवले गटात अस्वस्थता दिसून येत होती. तसेच आठवले यांनी भीमा कोरेगाव प्रकरणी कोणतीही भूमिका घेतली नसल्यामुळे राज्यातील अनेक कार्यकर्तेही नाराज आहेत. काही कार्यकर्त्यांनी आठवले यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर आठवले गटाची आज बैठक पार पडणार असून या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
COMMENTS