रामदास आठवलेंना धक्का, दोन मोठे नेते पक्षातून बाहेर पडणार?

रामदास आठवलेंना धक्का, दोन मोठे नेते पक्षातून बाहेर पडणार?


पुणे – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे. रिपाइंचे दोन मोठे नेते महेश शिंदे आणि हनुमंत साठे हे पक्षातून बाहेर पडणार आहेत. लोकसभेच्या जागावाटपात आणि महामडंळ वाटपात शिवसेना-भाजपने डावलल्याने रिपाइंच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. याच नाराजीतून हे दोन्ही नेते बाहेर पडणार असल्याची माहिती आहे.

दरम्या शिवसेना-भाजपची युती झाली परंतु या दोन्ही पक्षांनी महायुतीतल्या घटकपक्षांना दूर ठेवण्यात आले. त्यात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंच्या रिपाइंचाही समावेश आहे. त्यामुळे रिपाइंमध्ये सध्या नाराजीची खदखद सुरु आहे.या सर्व प्रकाराच्या निषेधार्थ रिपाइंच्या कामगार आघाडीचे नेते महेश शिंदे आणि मातंग आघाडीचे नेते हनुमंत साठे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राजीनामे देऊन बाहेर पडणार आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रिपाइंकडून शिवसेना-भाजप युतीची कोंडी करण्याचा प्रयत्न होणार असल्याचे दिसत आहे.

COMMENTS