रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांना मातृशोक

रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांना मातृशोक

मुंबई – केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आईचे गुरुवारी सकाळी निधन झाले. मुंबईतील गुरुनानक रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला.  हौसाबाई बंडू आठवले असे रामदास आठवले यांच्या आईचे नाव आहे. त्या 88 वर्षांच्या होत्या.
बुधवारी रात्री त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने वांद्रे पूर्व येथील गुरुनानक रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी सकाळी सात वाजताच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

वांद्रे येथील संविधान बंगल्यावर दुपारी 12 वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे.  त्यानंतर दुपारी 3 वाजताच्या सुमारास वांद्रे येथील खेरवाडीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

 

COMMENTS