आरएसएसमध्ये गाढव जरी आले तरी…… – एकनाथ खडसे

आरएसएसमध्ये गाढव जरी आले तरी…… – एकनाथ खडसे

जळगाव – भाजपमध्ये कमालीचे नाराज असलेले माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांची नाराजी दूर होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. संधी मिळाल्यावर ते भाजपला वारंवार लक्ष करताना दिसले आहेत. आता तर त्यांनी संघालाही टोला  हाणला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अशा प्रकारे संस्कार केले जातात की गाढव जरी संघात दाखल झाला तरी तो माणूस म्हणून बाहेर पडतो. सध्या भाजपमध्ये सुरू असलेल्या इन कमिंग वरून त्यांनी हा टोला लगावला.

भुसावळमध्ये ज्येष्ठ स्वयंसेवक बापूराव मांडे यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार सोहळ्यात खडसे यांनी हे वक्तव्य केले. विशेष म्हणजे संघाचे सहकार्यवाह भय्याजी जोशी, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित होते.

COMMENTS