जयंत पाटलाकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षाचे कार्यालय पेटवण्याची धमकी

जयंत पाटलाकडून राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षाचे कार्यालय पेटवण्याची धमकी

पुणे – राष्ट्रवादी महिलाकाॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांना एका व्यक्तीने फोन करून कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली. याप्रकरणी सिंहगज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री असलेल्या जयंत पाटील यांच्या नावाशी साधारम्य आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहेत.

पुण्यातील धायरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे कार्यालय असून याठिकाणी शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सदर व्यक्तीने फोन करत कार्यालय पेटवून देतो अशी धमकी दिली. यावेळी रुपाली चाकणकर कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. सदर घडलेला प्रकार चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी चाकणकर यांना सांगितले. त्यानंतर चाकणकर यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात सदर व्यक्ती विरोधात तक्रार दिली असून त्याआधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्या आरोपीचे नाव जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली) आहे. पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.

COMMENTS