मुंबई – सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची
मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेस नेेेेते सचिन सावंत यांनी केली आहे. दिलीप कांबळे यांनी दारूच्या दुकानाचा परवाना देण्यासाठी अडीच कोटी रुपयांची लाच घेतल्याचे समोर आले आहे. न्यायालयाने यावर शिक्कामोर्तब केलं असून न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मंत्री आपल्या बंगल्यात हस्तकांकरवी लाच स्वीकारतात हे समोर आलं आहे. विलास चव्हाण यांनी तशी फिर्याद केली असून दिलीप कांबळे यांनी सव्वा दोन कोटी रुपयांची लाच स्वीकारली असल्याचंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिडको पोलिसात याप्रकरणी चौघांविरोधात तक्रार देण्यात आली असून विलास चव्हाण असं तक्रारदाराचं नाव आहे. वाईन शॉपचा परवाना देतो असं अमिष दाखवून 1 कोटी 92 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तक्रारीनुसार या प्रकरणात दिलीप काळभोर या व्यक्तीने मध्यस्ती करून दिलीप कांबळे यांची भेट घडवली. खुद्द दिलीप कांबळे यांनी दारूच्या दुकानाचा परवाना मिळवून देईल असं आश्वासन दिलं होतं, अशी माहिती चव्हाण यांनी पोलिसांना दिली आहे.
त्यानंतर दिलीप कांबळे यांच्यावर काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीका केली असून दिलीप कांबळे यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी सावंत यांनी केली आहे.
COMMENTS