खासदार सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर !

खासदार सचिन तेंडुलकर पहिल्यांदाच उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर !

क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर आणि राज्यसभेतील खासदार सचिन तेंडुलकर हे पहिल्यांदाच उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यामुळे उस्मानाबादकरांना तेंडुलकर यांच्या दौ-याची उत्सुकता लागली आहे. देशातील प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेतलेले आहे. खासदार तेंडुलकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील डोंजा हे गाव दत्तक घेतले आहे. गावची पाहणी करण्यासाठी तेंडुलकर येत्या 16 तारखेला डोंजामध्ये येणार आहेत. या दौ-यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. परिसरातील रस्ते चकाचक केले जात आहेत. तसंस गावातील स्वच्छता मोहिमही हाती घेण्यात आली आहे.

COMMENTS