हल्ल्यानंतर सदाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, फक्त महापॉलिटिक्सवर !

हल्ल्यानंतर सदाभाऊंची पहिली प्रतिक्रिया, फक्त महापॉलिटिक्सवर !

सोलापूर – कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. सदाभाऊ खोत आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान माढा तालुक्यातील रिधोरे गावाजवळ त्यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली आहे. या हल्ल्यानंतर सदाभाऊ खोत यांनी प्रतिक्रिया दिली असून स्वाभिमानीच्या पायाखालची वाळू घसरू लागली असून, अशा भ्याड हल्ल्याला मी घाबरणार नाही. असं सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.