मुंबई – कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत आणि डीसीसीचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांच्यात शाब्दिक हल्लाबोल झाला असल्याचं पहावयास मिळत आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या पथकातील सोंगाड्याला (दिलीप तात्या) रात्री फुटाणे लागतात अशी जोरदार टीका कृषिराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे. तर फडणवीस यांच्या फडातील सदाभाऊ हे तर नाच्या असल्याचं सदाभाऊ यांचं काय चारित्र्य आहे ते चार महिन्यापूर्वी एका महिलेने दाखवून दिलं असल्याचं डीसीसीचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांनी म्हटलं आहे.
दरम्यान सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे विधानसभेतील गटनेते जयंत पाटील यांच्यात गेले काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहे. ते दोघंही एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. मंत्री झाल्यापासून खोत जयंत पाटलांच्यावर सातत्याने हल्ले करत आहेत. नुकत्याच झालेल्या अधिवेशनात जयंत पाटील यांनी खोतांवर घोटाळ्याचा आरोप करुन प्रतिहल्ला केला होता. त्याला खोत यांनीही जोरदार प्रत्त्युतर दिले होते. काही दिवसांपूर्वी हल्लाबोल यात्रेत जयंत पाटील यांनी सदाभाऊंची किंमत एक ते दीड आण असून त्यामुळे त्यांच्यावर बोलायला मी खाली जाणार नसल्याची टीका पाटील यांनी केली होती. त्यानंतर आता दिलीप तात्या पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यात शाब्दिक हल्लाबोल झाला असून एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. फडणवीसांच्या फडातील सदाभाऊ हे नाच्या असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे तर जयंत पाटलांच्या पथकातील सोंगाड्याला रात्री फुटाणे लागतात अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे. या दोघांच्या एकमेकांवरील टीकेमुळे आता जयंत पाटील आणि सदाभाऊ खोत यांच्यातील वाद वाढत असल्याचं दिसून येत आहे.
COMMENTS