कृषी राज्यमंत्री सदाभाऊंच्या गाडीवर दगडफेक, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड, पाहा एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडीओ !

कृषी राज्यमंत्री सदाभाऊंच्या गाडीवर दगडफेक, स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची धरपकड, पाहा एक्सक्लुझिव्ह फोटो आणि व्हिडीओ !

सोलापूर – कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. सदाभाऊ खोत आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. याच दरम्यान माढा तालुक्यातील रिधोरे गावाजवळ त्यांच्या गाडीवर हल्ला करत गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही दगडफेक केली आहे. या दगडफेकीत गाडीची काच फुटली असून सदाभाऊ मात्र सुखरुप असल्याची माहिती आहे.

दरम्यान लोकसभेवेळी सदाभाऊ खोत यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र निवडणुकीनंतर त्यांनी मतदारसंघाकडे पाठ फिरवल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी गाडीवर दगडफेक केली असल्याची माहिती आहे. तसेच त्यांचा निषेध म्हणून त्यांच्यावर गाजरे आणि मक्याची कणसे फेकण्यात आली आहेत.

२०१४ साली सदाभाऊ खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील यांनी त्यांच्या पराभव केला.

 

दरम्यान, खोत हे जेव्हपासून मंत्री झाले तेव्हांपासून त्यांनी माढा लोकसभेकडे पाठ फिरवल्याच्या रागातून स्थानिक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज खोत यांच्या विरोधात आंदोलन केलं आहे.

दरम्यान दगडफेक केल्याप्रकरणी स्‍वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचं आढळून आलं आहे.

COMMENTS