कृषी राज्यमंत्री सदाभाऊंचा ताफा पोहचला शेतकऱ्याच्या बांधावर !

कृषी राज्यमंत्री सदाभाऊंचा ताफा पोहचला शेतकऱ्याच्या बांधावर !

सांगली – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा ताफा थेट शेतक-याच्या बांधावर पोहचला असल्याचं आज पहावयास मिळालं. शेतकरी संवाद अभियानाअंतर्गत सदाभाऊ खोत यांनी शेतीच्या बांधावर जाऊन शेतक-यांशी संवाद साधला. वाळवा तालुक्याच्या दौ-यादरम्यान ऐतवडे बुद्रुक गावातून जाताना रस्त्याच्या बाजूला शेतात शेतकरी पेरणी करत असलेले पाहून भाऊंनी लागलीच आपला ताफा थांबवून थेट पेरणी चाललेल्या शेतात गेले. यावेळी भाऊंनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांनी थेट बैलजोडी व पेरणीची कुऱ्या हातात घेतल्या. भाऊंनी यापूर्वीही आपल्या शेतात पेरणीची मशागत केलेली होती. परंतु सध्या मंत्रिपदावर असूनही त्यांनी पेरणी केल्यामुळे शेतक-यांनी भाऊंचे कौतुक केले.

दरम्यान यावेळी शेतकरी अमोल एकनाथ वंडकर म्हणाले की,शेतकरी चळवळीतील नेता मंत्री झाला याचा आम्हाला अभिमान होता आणि तो आहे. अजूनही गाव गाड्यातला आमचा हा मंत्री शेतात आला आणि राबला, वास्तविक खऱ्या अर्थाने काळ्या मातीशी इमान जपलं याचा आम्हाला अभिमान वाटतो. इतिहासात पाहिल्यांदा कृषिमंत्री शेतकऱ्याबरोबर शेतात येऊन राबतो. हे आम्ही आमचं भाग्य मानतो की तुम्ही आमच्या शेतात येऊन पेरणी केली.यावेळी सचिन पायमल, सचिन गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, विश्वास पायमल, नागनाथ गायकवाड, विनायक जाधव, संजय पवार आदी शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS