मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी विरुद्ध सदाभाऊ खोत असा सामना रंगणार असल्याचं दिसत आहे. कारण सदाभाऊ खोत आजपासून दोन दिवस दिल्लीवारीला गेले आहेत. यादरम्यान ते भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेणार असल्याची माहिती आहे. सदाभाऊ खोत हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. भाजपही याबाबत सकारात्मक आहे परंतु अजून कोणताही निर्णय झालेला नाही.
भाजपनं जर सदाभाऊ खोत यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघामधून उमेदवारी दिली तर एकेकाळी राम लक्ष्मण म्हणून ओळखले जाणारे दोन जिवलग मित्र हे एकमेकांविरोधात निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तसेच सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवावी असा मतप्रवा आहे, कारण विधानपरिषद सदस्य असलेले सदाभाऊ खोत हे भाजपच्या चिन्हावर सदस्य झालेले आहेत. त्यामुळे त्यांच्या या दिल्लीवारी दरम्यान उमेदवारीची घोषणा होणार का हे पाहणं गरजेचं आहे.
COMMENTS