रायगडात भाजपचा काँग्रेसला दणका, माजी मंत्री  करणार भाजपमध्ये प्रवेश !

रायगडात भाजपचा काँग्रेसला दणका, माजी मंत्री करणार भाजपमध्ये प्रवेश !

रायगड – आगामी निवडणुकीच्या तोंडावर रायगडमध्ये भाजपनं काँग्रेसला दणका दिला आहे. माजी मंत्री रवींद्र पाटील हे भाजपात प्रवेश करणार आहेत. आज संध्याकाळी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहेत. शेकाप बरोबरच्या आघाडीने रवींद्र पाटील काँग्रेसवर नाराज असल्याची माहिती असून ते लवकरच पेण येथे जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसला मोठा धक्का बसणार असल्याचं दिसत आहे.

COMMENTS