सदाभाऊ खोत यांचे ‘सेल्फी विथ फार्मर’चे आदेश !

सदाभाऊ खोत यांचे ‘सेल्फी विथ फार्मर’चे आदेश !

पुणे – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कृषी खात्यातील अधिकाऱ्यांना ‘सेल्फी विथ फार्मर’चे आदेश दिले आहेत. खरीपाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांनी शेतीच्या बांधावर जाऊन सेल्फी घेण्याचा आदेश सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. अधिकारी शेतात बांधावर गेलेत याचा पुरावा म्हणून त्यांनी शेतकऱ्यांसोबत सेल्फी काढून पाठवावा असं सांगितलं आहे.

दरम्यान कृषी विभागातील आयुक्तांपासून ते गाव पातळीवरील कृषी सहाय्यकांपर्यंत सगळ्यांनी सेल्फी काढून पाठवण्याचे आदेश खोत यांनी दिले आहेत. तसेच यावर्षी कापसाचं लागवड क्षेत्र असल्याचही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं आहे.

खरीप पेरणी क्षेत्र – 152 लाख हेक्टर

कापूस 36 लाख हेक्टर (मागील वर्षी 42 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस होता)

सोयाबीन 36 लाख हेक्टर

तूर 16 लाख हेक्टर

तांदूळ 16 लाख हेक्टर

ज्वारी, गहू, इत्यादी तृणधान्य 9.30 लाख हेक्टर असल्याची माहिती सदाभाऊंनी यावेळी दिली आहे.

दरम्यान सदाभाऊ खोत यांनी दिलेल्या आदेशामुळे कृषी विभागातील आयुक्तांपासून ते गाव पातळीवरील कृषी सहाय्यकांना आता शेतक-यांच्या बांधावर जाऊन खरीपाची पाहणी करावी लागणार आहे.

COMMENTS