परभणी – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टोमॅटो फेकले आहेत. दुष्काळी परिस्थितीमध्ये टोमॅटोला किरकोळ भाव मिळत असल्यामुळे या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला आहे. तसेच शासनाच्या उपाययोजना ठप्प असल्याने शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदवत या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली. परभणीतील बसस्थानकाजवळ ही घटा घडली.
दरम्यान वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाच्या कार्यक्रमासाठी सदाभाऊ खोत आज परभणीत आले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर खोत यांच्या वाहनांचा ताफा स्टेशन रोड, बसस्थानक मार्गाने पाथरीकडे निघाला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, दिगंबर पवार, केशव आरमळ आदींसह इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर टोमॅटो फेकून त्यांचा निषेध केला.
COMMENTS