“आतंकवादी म्हटल्यावर आतंकवाद्याप्रमाणेच वागणूक मिळणार”, कुलभूषण जाधवबाबत सपा खासदाराचं वक्तव्य !

“आतंकवादी म्हटल्यावर आतंकवाद्याप्रमाणेच वागणूक मिळणार”, कुलभूषण जाधवबाबत सपा खासदाराचं वक्तव्य !

दिल्ली – पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली आतंकवादी घोषित करत त्यांना फाशीची शिक्षा जाहीर केली आहे. तसेच पाकिस्तानकडून कुलभूषण आणि त्यांच्या कुटुंबियांना योग्य वागणूक न दिल्यामुळे देशभरातून पाकिस्तानवर टीकास्त्र केलं जात आहे. परंतु कुलभूषण जाधव यांना पाकिस्ताननं आतंकवादी म्हणून ताब्यात घेतलं आहे. त्यामुळे ते आतंकवाद्याप्रमाणेच त्यांना वागणूक देणार असं वक्तव्य सपाचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केलं आहे.

प्रत्येक देशाचा एक कायदा असतो. आपल्या देशाहतही आपण आतंकवाद्याला आतंकवाद्याप्रमाणेच वागणूक देत असतो. त्यामुळे यात गैर काही नाही तसेच कुलभूषण यांच्याव्यतीरीक्त पाकिस्तानच्या कोठडीत अनेक भारतीय आहेत. त्यामुळे त्यांचाही विचार करायला हवा असंही खासदार नरेश अग्रवाल यांनी म्हटलं आहे.कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाच्या सेवेत होते, आणि आता ते निवृत्त झाले असल्याचे भारताने स्पष्ट केले आहे. तसेच, त्यांचा कुठल्याही दहशतवादी कारवायांशी संबंध नसून जाधव यांच्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयातही दाद मागितली आहे. त्यामुळे न्यायालय जो निकाल देईल तो मानावा लागेल असंही अग्रवाल यांनी त्यावेळी म्हटलं आहे.

 

COMMENTS