“उदयनराजेंनी छत्रपतीपदाचा गैरवापर करु नये !”

“उदयनराजेंनी छत्रपतीपदाचा गैरवापर करु नये !”

औरंगाबाद – कोरेगाव- भीमाप्रकरणी संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना उदयनराजेंनी पाठिशी घालू नये असं वक्तव्य संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी केलं आहे.कोरेगाव भीमा प्रकरण हे अचानक घडलं नसून संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेंचा तो पूर्वनियोजित कट आहे. त्यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांना पाठिसी घालू नये. तुम्ही छत्रपतींचे वारसदार आहात याचा आम्ही सन्मान करतो परंतु तुम्ही छत्रपतीपदाचा गैरवापर करु नका असं भानुसे यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलं आहे.

संभाजी ब्रिगेड आणि मिलिंद एकबोटे यांना खासदार उदयनराजे भोसले यांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यांचा या घटनेशी काहीही संबंध नसून त्यांच्यावर टीका करण्याची तुमची लायकी नसल्याचं उदयनराजेंनी म्हटलं होतं. त्यावर भानुसे यांनी हे वक्तव्य केलं असून भीमा- कोरेगाव प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असताना शांततेसाठी आम्ही प्रयत्न केले. त्यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या बंदला पाठिंबा दिला. 1818 चे युद्ध सन्मानासाठी झाले होते; परंतु ते युद्ध मराठा विरुद्ध महार असे झाल्याचे संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे हे खोटे सांगत आहेत.भीमा- कोरेगाव परिसरात स्थानिकांचा जो गैरसमज झालेला आहे, तो दूर करण्यासाठी छत्रपती उदयनराजेंनी पुढाकार घ्यावा. त्यांनी सातारा सोडावे, आम्ही त्यांच्यासोबत फिरायला तयार आहोत परंतु  उदयनराजेंनी भिडे, एकबोटेंना पाठीशी घालू नये. असंही भानुसे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS