मराठा तरूणांना मिळणार दोन हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज !

मराठा तरूणांना मिळणार दोन हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज !

मुंबई – राज्यातील मराठा तरुणांना दोन हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. बेरोजगार तरूणांना स्वयंरोजगारासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राष्ट्रीयीकृत बँका व नागरी सहकारी बँकांमार्फत दोन हजार  कोटींचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी दोनशे कोटींचे व्याज शासन भरणार असून येत्या २६ जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या या योजनेचा लाभ सुमारे ३० हजार मराठा तरूणांना मिळणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख दिली आहे.या योजनेद्वारे मराठा लाभार्थ्यांना १० लाख ते ५० लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे.

कर्ज घेण्यासाठी अटी व शर्थी

आठ लाख रुपये उत्पन्नाच्या मर्यादेतील लाभार्थ्यांना वैयक्तिक व गटाने व्यवसाय, उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी सर्व व्यवहार पोर्टलवर आधारलिंक बायोमॅट्रिक प्रणाली किंवा मोबाइल अ‍ॅप अथवा युआयडीयुक्त प्रणालीद्वारे नोंदणी करणे गरजेचे आहे. आधारकार्ड, रहिवास दाखला, विद्युत बिल, मतदार ओळखपत्र, रेशनकार्ड यापैकी कोणताही एक पुरावा दिला पाहिजे. संबंधित व्यवसायाबाबत लाभार्थी किंवा गटाने व्यवसाय सुरू करण्याच्या दिवशीचे व्यवसायाचे छायाचित्र अपलोड करणे गरजेचे. दिव्यांगांसाठी  योजनानिहाय एकूण निधीच्या ४ टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे.गट प्रकल्पासाठी गटाचे सर्व सदस्य शंभर टक्के लाभार्थी दिव्यांग असावेत. तसेच त्या गटाच्या संचालक मंडळावर किमान ६० टक्के दिव्यांग सदस्य असावेत. कर्जाचा हप्ता किंवा व्याजाचा महामंडळाने योजनेंतर्गतचा लाभ हा कर्ज घेतल्यापासून पाच वर्षांपर्यंत किंवा प्रत्यक्ष कर्ज कालावधी यापेक्षा कमी असेल ते लागू करण्यात येणार आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत लाभार्थ्यांचे वय १८ ते ४५ वर्षांपर्यंत असणं गरजेचं आहे.

COMMENTS