पुणे शहरातील ‘पे अँड पार्क’च्या तुघलकी धोरणास ‘संभाजी ब्रिगेड’चा विरोध !

पुणे शहरातील ‘पे अँड पार्क’च्या तुघलकी धोरणास ‘संभाजी ब्रिगेड’चा विरोध !

पुणे – शहरातील सामान्य नागरिकांना दुचाकीला रस्त्यावरील पार्किंगसाठी (अ भागासाठी 10 रुपये तासाला) आकारण्यात येणार आहेत. तर (क भागासाठी 20 रुपये) आकारण्यात येणार आहेत. तर चारचाकी वाहनांसाठी प्रति तासासाठी (50 आणि 100 रुपये) अशा पध्दतीचे शुल्क आकारण्यात येणार आहेत. याला संभाजी ब्रिगेडनं विरोध केला असून हा शहरी व पार्किंग नसलेल्या भागांसाठी तुघलकी फतवा आहे. शहरात मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असले तरी मेट्रो प्रकल्पा लगत जनतेची दिशाभूल करून ‘पे अँड पार्क’ करण्याचा प्रयत्न झाला. परंतु केंद्र सरकार व राज्य सरकारने पार्किंग पॉलिसीबाबत असे कधीही जाहीर केलेले नाही. अथवा टेंडरमध्येही तशी तरतूद नसावी. मात्र हा झिजीय कर पुणेकरांच्या माथी मारला जात असल्याची टीका संभाजी ब्रिगेडनं केली आहे.

दरम्यान वाढत्या महागाईने सामान्य नागरिक त्रस्त आहेत. दैनंदिन कामासाठी फिरणाऱ्यांना पे अँड पार्क’ चा झिजीया कर महानगरपालिकेने लादू नये याला संभाजी ब्रिगेडचा विरोध आहे. शहरात रात्रीच्या वेळेस सोसायटीत पार्किंग नसल्याने अनेक वाहने रस्त्यावर लावण्यात येतात. मध्यवर्ती पेठांमधील काही भागांमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे नागरिकांवर ही वेळ येते आहे. त्यामुळे ‘रात्रीच्या वेळी सुध्दा रस्त्यावर सशुल्क पे अँड पार्क धोरण राबविले जाणार आहे. त्याचा फटका सोसायट्यांमध्ये पार्किग नसलेल्यांना बसणार आहे.’ प्रशासनाचा हा अतिशहाणपणा आहे असेच दिसते. तो सामान्य नागरिकांना परवडणारे नाही. पार्किंग प़ॉलिसी ही Rss च्या संस्थेसाठी उपयोगाची आहे. या संस्थेचे लोक मनपा आयुक्त दरबारी पार्किंग पॉलिसीचे सुचक व अनुमोदक आहेत. तेच जास्त आग्रही आहेत. हा आयुक्तांचा गेम आहे. पुणे शहरातील नागरिकांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या पार्किंग पॉलिसी धोरणास म्हणजे शहरातील सर्व रस्त्यावर ‘पे अँड पार्क’ करण्यास संभाजी ब्रिगेडचा विरोध असल्याचं संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS