घटना दुरूस्तीसंदर्भात पवारांच्या भूमिकेशी सहमत – संभाजी राजे

घटना दुरूस्तीसंदर्भात पवारांच्या भूमिकेशी सहमत – संभाजी राजे

मुंबई – घटना दुरूस्ती केली तर मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवारांच्या या भूमिकेशी आपण सहमत असल्याचं वक्तव्य खासदार संभाजी राजे यांनी केलं आहे. घटना दुरूस्तीसंदर्भात पवारांच्या भूमिकेशी सहमत  असल्याचं संभाजी राजेंनी म्हटलं आहे. तसेच घटना दुरूस्ती करण्यासाठी मी पुढाकार घेईन असंही संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मी मराठा समाजाचे नेतृत्व करणार नसून गेल्यावर्षी मला जबरदस्तीने आंदोलनाच्या स्टेजवर नेले गेले. यावेळेस मी मराठा समाजाचे नेतृत्व करणार नसून मी समन्वयाची भूमिका करू शकेन असंही संभाजी राजे यांनी यावेळी म्हटलं आहे. तसेच एकट्या उदयनराजेंसोबत जाणार नाही. त्यांच्यासोबत तालुक्यातून २ आणि जिल्ह्यातून ५ प्रतिनिधी असावेत असंही संभाजी राजे यांनी म्हटलं आहे. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन राज्यातील काही आमदारांनी राजीनामा दिला आहे. यावरही संभाजी राजे यांनी टीका केली असून फक्त  खुष करण्यासाठी राजीनामा दिले जात असून राजीनामा देण्याऐवजी आरक्षणासाठी लढणे महत्त्वाचे असचं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे

COMMENTS