सांगली महापालिकेत प्रस्थापितांना धक्का, तीन माजी महापौर पराभूत !

सांगली महापालिकेत प्रस्थापितांना धक्का, तीन माजी महापौर पराभूत !

सांगली – सांगली महापालिकेत भाजपनं बाजी मारली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. याचबरोबर या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का बसला आहे तर तीन माजी महापौर या निवडणुकीत पराभूत झाले आहेत. माजी महापौर आणि भाजपचे विवेक कांबळे, काँग्रेसचे माजी महापौर किशोर जामदार, राष्ट्रवादीचे माजी महापौर इद्रिस नायकवडी या तिघांना पराभव पत्करावा लागला आहे.

दरम्यान या निवडणुकीत इतर दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला असून राष्ट्रवादीचे धनपाल खोत, काँग्रेसचे प्रमोद सूर्यवंशी, अजित सूर्यवंशी, दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे हरिदास पाटील, भाजपाचे रणजितसिंह सावर्डेकर, विक्रमसिंह सावर्डेकर आणि मुन्ना कुरणे यांचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीसह या दिग्गज उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS