सांगली महापालिका निवडणूक, सर्व पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर, वाचा सविस्तर !

सांगली महापालिका निवडणूक, सर्व पक्षांच्या उमेदवारांची यादी जाहीर, वाचा सविस्तर !

सांगली  सांगली महापालिका निवडणुकीसाठी आज सर्वच पक्षांनी आपल्या उमेवारांची यादी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे कोणत्या पक्षातून कोणाला उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच या महापालिकेत कोणता पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार आहे असे अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात सुरु होते. या सर्व प्रश्नांची उत्तरं अखेर मिळाली असून या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आहेत, तर शिवसेना आणि भाजपनं स्वतंत्र लढण्याच निर्णय घेतला आहे.

दरम्यान 78 पैकी 40 जागांवर काँग्रेस तर 29 जागांवर राष्ट्रवादी लढणार आहे. तसेच पाच ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार असून चार जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे पुरस्कृत उमेदवार लढणार आहेत. तर भाजपने 78 पैकी 78 उमेदवार जाहीर केले आहेत. तर शिवसेनेने 78 पैकी 52 ठिकाणी उमेदवार दिले आहेत.

तसेच या निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदाच आम आदमी पक्ष आणि सांगली सुधार समिती आपलं नशीब आजमावणार आहे. हे दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन 50 उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक रंगतदार होणार असल्याचं दिसत असून आम आदमी पक्ष आणि सांगली सुधार समितीला कितपत यश येणार याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS