मुंबई – मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा पदभार काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आज स्वीकारला. मावळते अध्यक्ष संजय निरुपम यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मावळते अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मला चार वर्ष सहकार्य करणार्यांचे तसेच चार वर्ष असहकार्याचे वातावरण निर्माण केले त्यांचे आभार. माझ्याबरोबर आले त्यांच्याबरोबर मी काम केले, जे सोबत आले नाहीत, त्यांना मी काट्याप्रमाणे मुंबई काँग्रेसमध्ये होतो. तो काटा आज दूर झाला आहे, त्यामुळे काही लोकांचे दुखणे बरे होईल. मिलिंद देवरा माझे मित्र आहेत, त्यांच्याशी माझे काही मतभेद नाहीत आणि नव्हते. राहुल आणि सोनिया गांधी यांनी त्यांची नियुक्ती केली आहे, ती सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे.आपल्याकडे एक महिना आहे, मुंबईतील सहाच्या सहा जागा जिंकण्यासाठी आपण सर्वांनी दिवसरात्र मेहनत केली पाहिजे असं निरुपम यांनी म्हटलं आहे.
Irrespective of caste, religion and their economic status we will take everyone together, this is Mumbai, this is the essence of Mumbai : @milinddeora President, MRCC pic.twitter.com/w5oNyuyiEE
— MumbaiCongress (@INCMumbai) March 28, 2019
तसेच यावेळी मिलिंद देवरा यांनीही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी आम्ही राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे राहुल गांधी आमची विनंती मान्य करतील असं देवरा यांनी म्हटलं आहे.तसेच संजय निरुपम यांनी सांगितले की हे पद काटेरी मुकुट आहे. मलाही एक दिवस हे पद दुसर्याला द्यावे लागेल. काँग्रेस पक्षाला आक्रमक संघटना म्हणून मुंबईत ओळखले जाऊ लागले आहे. त्याचे श्रेय मी निरुपम यांना देतो.
मुरली देवरा आणि गुरुदास कामत यांचे आशिर्वाद मला लाभतील. मुरली देवरा यांनी 43 व्या वर्षी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारले होते. मी 42 व्या वर्षी हे पद स्वीकारत आहे.मात्र मुरली देवरांप्रमाणे 22 वर्ष मी हे पद सांभाळू शकत नाही. शिवसेना 2014 साली मोदी जिंदाबाद आणि राहुल गांधी मुर्दाबाद घोषणा देत होती. सत्ता आल्यानंतर मोदी मुर्दाबाद आणि राहुल गांधी जिंदाबाद करू लागले. त्यामुळे शिवसेना स्वार्थाचे राजकारण करत असल्याची टीकाही यावेळी देवरा यांनी केली आहे.
Our mission our goal is to first win the election, I personally feel, Mumbai has lost it's voice : @milinddeora President, MRCC pic.twitter.com/VExzwIDbwK
— MumbaiCongress (@INCMumbai) March 28, 2019
COMMENTS