राज्यातील ‘या’ मतदारसंघात तिढा कायम !

राज्यातील ‘या’ मतदारसंघात तिढा कायम !

मुंबई – आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी आणि शिवसेना-भाजप युतीच्या काही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. परंतु अजूनही काही मतदारसंघातील उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली नाहीत. त्यामुळे याठिकाणी तिढा कायम असल्याचं दिसत आहे. यामध्ये ईशान्य मुंबई, पालघर, उत्तर मुंबई, पुणे आणि रावेर माढा, जळगाव, या जागांवरी उमेदवारांची घोषणा अजून करण्यात आलेली नाही. त्यामुळे याठिकाणी उमेदवारांची नावं कधी जाहीर करणार असा प्रश्न स्थानिक कार्यकर्त्यांना पडला आहे.

दरम्यान पुणे मतदारसंघातून काँग्रेसनं अजून  उमेदवार जाहीर केलेला नाही, तर भाजपचा माढ्यातला उमेदवार अजून ठरलेला नाही. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या रावेरचा उमेदवारही अजून गुलगस्त्यात आहे. त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाचा तिढा अजून कायम असल्याचं दिसत आहे. तसेच भाजपचे गोपाळ शेट्टी खासदार असलेल्या उत्तर मुंबई मतदारसंघाचा उमेदवार अजून ठरलेला नाही. नुकतीच काँग्रेसवासी झालेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला इथून उमेदवारी दिली जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर पालघरमध्ये शिवसेनेने भाजपचे खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर केली आहे.परंतु बहुजन विकास आघाडीनं अजून उमेदवाराची घोषणा केलेली नाही.तसेच ईशान्य मुंबईत भाजपनं अजून उमेदवारांची घोषणा केलेली नाही.याठिकाणी शिवसेनेनं किरीट सोमय्यांना विरोध दर्शवला असल्यामुळे तिढा कायम आहे.

तर जळगाव जिल्ह्यातील लोकसभेच्या रावेर मतदारसंघात भाजपकडून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीत मात्री उमेदवारीवरुन याठिकाणी तिढा कायम आहे.तसेच सांगली मतदारसंघाची जागा काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिली आहे. परंतु स्वाभिमानीने अजून याठिकाणी आपला उमदेवारी जाहीर केलेला नाही.

COMMENTS