त्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही

त्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही

मुंबई – “ज्या पद्दतीने भाजपची ही मंडळी तोंडफाट आरोप करत सुटले आहेत त्यातून काही निष्पन्न होणार नाही. काहीही कागदं फडकावतात आणि आरोप करतात. प्रताप सरनाईक, राज्यातील प्रमुख नेते तसंच मी आणि माझ्या कुटुंबासोबत हेच केलं. हिंमत असेल तर यांनी हे आरोप सिद्ध करुन दाखवले पाहिजेत. अब्रु नुकसानीचे खटले वैगैरे ठीक आहे ते कोर्टात जाईल पण आरोप सिद्ध झाले नाही तर ईडीच्या कार्यालयासमोर या आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही, असा इशारा संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर केले आहे.

ईडीची कारवाईवरून सध्या भाजप आणि शिवसेनेत आरोप प्रत्यारोप रंगत आहे. यावर किरीट सोमय्या यांनी केलेल्या आरोपवर संजय राऊत यांनी हल्ला चढवला. राऊत म्हणाले, “ही कायद्याच्या पलीकडची भाषा असेल, पण मला आणि पक्षाला प्रतिष्ठा महत्वाची आहे. जे कायद्याच्या पलीकडे जाऊन भाष्य करत आहेत त्यांच्याकडे कायद्याची कोणती चौकट आहे? पक्षाने आमचा या व्यक्तीशी कोणताही संबंध नाही असं सांगावं. ही माकडं उड्या मारत आहेत त्यांच्याशी संबंध नाही असं त्यांनी सांगावं,” असा टोला लगावला आहे.

COMMENTS