मुंबई – शिवसेना – भाजप युतीसंदर्भा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. 2014 ला भाजप सरकारला पाठिंबा दिला नसता तर आज वेगळे चित्र असते. माताेश्रीबाहेर युती करण्यासाठी अनेकांनी रांगा लावल्या असत्या. सत्तेत सहभागी असताना आम्ही समर्थ पर्याय हाेवू शकताे का, पूर्ण सत्ता मिळवण्यासाठी याचे चिंतन केले तर विराेधी पक्ष हा पर्याय असताे. चर्चा सुरू आहे, ती पुढं सरकत आहे. येत्या काही तासांमध्ये याचा निकाल लागेल. प्रमुख लाेक घासाघीस करतायत, प्रत्येक जागेवर चर्चा हाेतेय, त्यामुळं आताच अंदाज बांधू नका. २८८ जागांची वाटणी करणं हे फाळणीपेक्षाही कठीण असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान शिवसेना साता-याची जागा भाजपला देणार आहे. तसेच उदयनराजेंनी लाेकसभेपूर्वीच पक्ष साेडला असता तर बरे झाले असते. २०-२५ काेटींचा जाे धुरळा उडाला, ताे उडाला नसता.परत पुन्हा सरकारी यंत्रणा, पैसे खर्च हाेणार आहेत, हा एक प्रकारचा गुन्हा आहे. हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे. युती असाे वा नसाे शिवसेनेतून कुणीही फुटून जाणार नाही. गेली पाच वर्षे तसे प्रयत्न झाले, पण शिवसेनेचे सर्व आमदार जागच्या जागी आहेत असंही राऊत यांनी म्हटलं आहे.
COMMENTS