म्हणूण… सरकारचा पाठिंबा काढला नाही –संजय राऊत

म्हणूण… सरकारचा पाठिंबा काढला नाही –संजय राऊत

पिंपरी-चिंचवड – शिवसेना-भाजपची सत्ता आल्यापासून अनेकवेळा सत्तेतून बाहेर पडण्याचं वक्तव्य शिवसैनिक आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलं असल्याचं पहावयास मिळालं आहे. विरोधकांनीही यावर जोरदार टीका करत बोलण्यापेक्षा थेट करुन दाखवण्याचं आव्हान अनेकवेळा शिवसेनेला केलं होतं. मंगळवारी झालेल्या  शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याची घोषणा केली आहे. शिवसेनेच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. दुटप्पी राजकारण सोडून सरकारमधून थेट बाहेर पडण्याचं आव्हान यावेळी अजित पवार यांनी केलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं असून महाराष्ट्र अस्थिर होऊ नये म्हणून सरकारचा पाठिंबा काढला नसल्याचं म्हटलं आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. त्यावेळी बोलत असताना त्यांनी विरोधकांवरही जोरदार टीका केली आहे. संजय काकडे यांनीही आगामी लोकसभेची निवडणूक शिवसेनेनं स्वतंत्र लढवू नये नाही तर ५ खासदारही निवडून येणं मुश्कील होईल असं वक्तव्य केलं होतं. यावरही संजय राऊत यांनी टीका करत शिवसेनेचं नुकसान होईल म्हणणा-यांनी मेंदूचा उपचार करावा असं म्हटलं होतं.

COMMENTS