…त्यामुळे उद्धव ठाकरे माझ्यावर रागावले – संजय राऊत

…त्यामुळे उद्धव ठाकरे माझ्यावर रागावले – संजय राऊत

मुंबई – लीलावती रुग्णालयातून शिवसेना नेते संजय राऊत यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. डिस्चार्जनंतर संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.अडीच- अडीच वर्षाचा मुख्यमंत्री पुढच्या गोष्टी असून मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल असं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच तब्येतीची काळजी न घेतल्याने उद्धव ठाकरे आपल्यावर रागावले असून त्यांनी तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला असल्याचं यावेळी राऊत म्हणाले आहेत.

दरम्यान सत्तास्थापनेसाठी राज्यात नाट्यमय घडामोडी घडत असताना शिवसेनेची खिंड लढवणारे खासदार संजय राऊत यांच्या छातीत दुखू लागल्याने सोमवारी दुपारी त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर संजय राऊत यांना अतिदक्षता विभागात ठेवून आवश्यक चाचण्या आणि अँन्जिओग्राफी करण्यात आली.

त्यात दोन ब्लॉकेजेस आढळळ्याने डॉ मॅथ्यू यांनी त्यांच्यावर अँन्जिओप्लास्टी केली. दोन दिवस विश्रांतीसाठी त्यांना रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. अखेर आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतरही त्यांनी मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

COMMENTS