नक्षलवाद्यांना राजकीय पाठिंबा, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे खळबळ !

नक्षलवाद्यांना राजकीय पाठिंबा, संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे खळबळ !

मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात नक्षलवाद्यांना राजकीय पाठिंबा असू शकतो, असं धक्कादायक विधान संजय राऊत यांनी केलं आहे. राऊत यांच्या या वक्तव्यामुळे नक्षलवाद्यांना कोणाचा पाठिंबा असू शकतो असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

दरम्यान आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने  हल्ल्याबाबत निषेध केला आहे. नक्षलविरोधी पथकातील जवानांची वाहतूक खासगी वाहनांमधून केली जात होती. तरीही जांभूरखेडा येथे नक्षल्यांनी खासगी वाहनातून जाणाऱ्या जवानांना लक्ष्य केले. जवानांविषयीची बातमी नक्षलींपर्यंत कोणी पोहोचवली, हे देशद्रोही कोण होते?? असा सवाल या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

COMMENTS