मुलींनो, पालकांची संमती असेल तर 18 वर्ष, नसेल तर 21 वर्ष झाल्यावरच लग्न करा – लोकसभेत विधेयक

मुलींनो, पालकांची संमती असेल तर 18 वर्ष, नसेल तर 21 वर्ष झाल्यावरच लग्न करा – लोकसभेत विधेयक

दिल्ली – महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी आज लोकसभेत एक वेगळीच मागणी केली आहे. मुलींच्या लग्नाबाबत त्यांनी ही मागणी केलीय. मुलींचं लग्न पालकांच्या संमतीने होत असेल तर त्यासाठी सध्या असलेलं 18 वर्ष योग्य आहे, मात्र मुली पालकांच्या समंतीशिवाय लग्न करत असतील तर त्यासाठी वयाची मर्यादा 21 वर्ष करावी अशी मागणी उत्तर मुंबईचे भाजपचे खासदार गोपळ शेट्टी यांनी केली आहे. त्यासंदर्भातील खाजगी विधेयक ते उद्या लोकसभेत मांडणार आहेत.

आयुष्यातील सर्वात महत्वाचा निर्णय घेताना 18 व्या वर्षी मुली योग्य निर्णय घेतीलच असं नाही, त्यामुळे 21 वर्ष झाल्यावर त्या अधिक परिपक्व आणि योग्य निर्णय घेतली त्यामुळे आपण हे विधयक आणत असल्याचं गोपाळ शेट्टी यांनी म्हटलं आहे. देशाचं भवितव्य ठरवणा-या मतदान करण्यास मुली 18 वर्षा पात्र ठरतात, मात्र मतदानाचा निर्णय बदल करण्याची पाच वर्षानंतर संधी असते, लग्नासारख्या गोष्टी आयुष्यात एकदाच होतात. त्यामुळे त्याची मतदानाच्या वयाशी तुलना करता येणार नाही असंही शेट्टी यांनी म्हटलं आहे. यावर आता लोकसभेत काय निर्णय होतो. विविध खासदारांच्या यावर काय प्रतिक्रिया येतात ते पाहण औत्सुक्याचं ठरेल.

COMMENTS