सातारा नगरपालीकेकडून सर्व गणेश मंडळांना नोटीस !

सातारा नगरपालीकेकडून सर्व गणेश मंडळांना नोटीस !

सातारा – साता-यात गणपती विसर्जनाच्या दिवशी डॉल्बी आणि डीजेवर बंदी आणल्यानंतर आता सातारा नगरपालीकेनं सर्व गणेश मंडळांना नोटिसा पाठवल्या आहेत. शहरातील कोणत्याही तळ्यात मुर्तीचे विसर्जन न करण्याचे आदेश नगरपालिकेनं या मंडळांना दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिकेने या नोटिसा काढल्या असल्याची माहिती आहे.

दरम्यान घरगुती विसर्जना ही तळ्यात न करण्याचा सूचना महापालिकेने दिल्या आहेत. त्यामुळे उदयनराजेंच्या भुमिकेकडे आता सातारकरांचे लक्ष लागलं आहे. नगरपालिकेत खासदार उदयनराजेंचीच सत्ता असताना ही नोटीस काढण्यात आली आहे. तसेच तळ्यात विसर्जन करणारच अशी भूमिका उदयनराजेंनी घेतली होती. तसेच गणपती विसर्जनाच्या दिवशी डॉल्बी आणि डीजेवर कोर्टानं बंदीचे आदेश दिले होते. त्यावेळीही याला विरोध करत उदयनराजे यांनी डॉल्बी वाजवणारच अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर आता महापालिकेनं तळ्यात मुर्तीचे विसर्जन न करण्याची नोटीस दिली आहे. त्यामुळे महापालिकेच्या नोटीसीनंतरही उदयनराजे तळ्यातच गणेश विसर्जन करणार का याकडे लक्ष लागलं आहे.

COMMENTS