किती ‘ही’ लाचारी, भाजपच्या खासदाराचे पाय धूऊन कार्यकर्ते पाणी प्यायले ! VIDEO

किती ‘ही’ लाचारी, भाजपच्या खासदाराचे पाय धूऊन कार्यकर्ते पाणी प्यायले ! VIDEO

झारखंडमधील भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या कार्यकर्त्यांनी एका कार्यक्रमात त्यांचे पाय धुवून ते प्यायले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या कार्यकर्त्यांच्या लाचारीवर देशभरातून टीका केली जात आहे. झालं अस की रविवारी निशिकांत दुबे यांच्या मतदारसंघात एका पूलाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा झाला. यावेळी पंकज साह हा भाजपा कार्यकर्ता निशिकांत दुबे यांचे पाय धुवून पाणी प्यायला. खरंतर निशिकांत दुबे यांनी असे करण्यापासून त्या कार्यकर्त्याला रोखणे अपेक्षित होते.पण निशिकांत दुबे यांनी त्या कार्यकर्त्याला रोखले नाही. उलट त्यांनी तो फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केला. हा फोटो समोर आल्यापासून निशिकांत दुबे यांच्यावर चहूबाजूंनी टीका केली जात आहे.

COMMENTS