सातारा – मी नसतो तर साताऱ्यातील अनेक ऑफिस हे बारामतीला गेले असते. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना सातारा जिल्हा ठेवायचा नव्हता, तो बारामतीला जोडायचा प्लॅन होता. बारामती जिल्हा आणि कराड जिल्हा. तुम्हाला सातारा नावच दिसले नसते. असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी शरद पवारांना लगावला आहे. तुम्ही जर आमच्या तोंडचा घास हिसकावत असाल तर कोण गप्प बसणार? बाकीचे गप्प बसतील मी गप्प बसणार नाही असंही उदयनराजे भोसले यांनी यावेळी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
दरम्यान मी लोकांची कामं करतो म्हणूनच कॉलर उडवतो असं म्हणत खासदार उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा कॉलर उडवली आहे. दिलदारपणा हवा. उगीच कॉलर उडवत नाही. लोकांची कामं करतो म्हणूनच कॉलर उडवतो. तुम्ही कामाच्या बाबतीत बोला. मी असं केलं आणि तसं केलं अशी फालतूगिरी नको असंही उदयनराजे भोसले यांनी म्हटलं आहे. रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष हा मुख्यमंत्री असावा अशी इच्छा कर्मवीर भाऊराव पाटील यांची होती. रयत शिक्षण संस्थेत मला किंवा आवडता म्हणून शिवेंद्रलातरी घ्यायला पाहिजे होते. रयत ही एक संस्था राहिली नसून ती एक खासगी इन्स्टिट्यूट झाली आहे. जर शिवेंद्रला संस्थेत घेतले असते तर त्यांच्या जशा सर्व संस्था डबऱ्यात गेल्या तशी रयतही डबऱ्यात गेली असती”, असा हल्लाही यावेळी उदयनराजेंनी शिवेंद्रसिंह राजे यांच्यावर केला आहे.
COMMENTS