न्यूटनच्या आधीच वेदामध्ये गतीविषयी नियम – केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह

न्यूटनच्या आधीच वेदामध्ये गतीविषयी नियम – केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंह

तुम्ही तुमच्या विज्ञानाच्या पुस्तकात गतिविषयक निममांचा शोध न्यूटन या शास्त्रज्ञाने लावला असं वाचलं असेल. मात्र ते चूक आहे. कारण न्यूटनच्या आधीच वेदांमध्ये गतीविषयक नियम सांगितलेले आहे. हा दावा आमचा नाही, तर देशाचे केंद्रीय मनुष्यब विकास मंत्री सत्यपाल सिंह यांनी केला आहे. केंद्रीय शिक्षण सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली. त्यामध्ये सत्यपाल सिंह यांनी हे विधान केले आहे. हिंदुस्तान टाईम्स या वृत्तपत्राने हे वृत्त दिलं आहे. त्यामुळे आपली पारंपारिक शिक्षण पद्धतीच उत्कृष्ट आहे. तिचा शालेय शिक्षणामध्ये समावेश करायला हवा असंही सत्यपाल सिंह म्हणाले.

काही दिवसांपूर्वी डार्विन या शास्त्रज्ञाच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतालाही सत्यपाल सिंह यांनी आव्हान दिलं होतं. मानवाची उत्पत्ती ही माकडापासून झालीच नाही असा दावा त्यांनी केला होता. त्यामुळे त्याचा सिद्धांत अभ्यासक्रमातून हटवायला हवा असंही सत्यपाल सिंह म्हणाले होते. मानव थेट मानव म्हणूनच पृथ्वीतलावर जन्माला आला असंही ते म्हणाले होते. त्यावेळी सत्यपाल सिंह यांच्यावर समाजातील सर्वस्तरातून चौफेर टीका झाली होती. मात्र असं असतानाही त्यांनी पुन्हा एकदा अशा प्रकारचं हास्यास्पद विधान केलं आहे. त्यावरुनही त्यांच्यावर आता टीका होण्याची शक्यता आहे.

COMMENTS