सुप्रिम कोर्टाचा भाजपला दणका, येडीयुरप्पांना उद्या 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचा आदेश !

सुप्रिम कोर्टाचा भाजपला दणका, येडीयुरप्पांना उद्या 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचा आदेश !

नवी दिल्ली – कर्नाटकातील भाजप सरकार केवळ दोन दिवसांचे ठरण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील भाजपच्या येडीयुरप्पा यांच्या सरकराला उद्या 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सुप्रिम कोर्टानं दिले आहेत. त्यामुळे भाजप कर्नाटकातील सत्तासंघर्षात तोंडघशी पडण्याची शक्यता आहे. भाजपच्या येडीयुरप्पा यांना सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाविरोधात काँग्रेस आणि जेडीएस यांनी सुप्रिम कोर्टात धाव घेतली होती. त्यावर सुप्रिम कोर्टाने येडीयुरप्पा यांना उद्या 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

आज सुनावणी दरम्यान भाजपच्या वतीने बाजु मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी सुप्रिम कोर्टात दोन पत्र सादर केली. पहिल्या पत्रामध्ये सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे राज्यपालांनी भाजपला सरकार स्थापन करण्याचा आमंत्रण दिले असल्याचं सांगितलं. मात्र सुप्रिम कोर्टाने काल पाठिंबा देणा-या आमदरांची यादी सादर करण्याचे आदेश भाजपला आणि येडीयुरप्पा यांना दिले होते. मात्र आज मुकुल रोहतगी यांनी त्यांच्या दुस-या पत्रात अशी यादी देण्याची गरज असल्याचं सांगितलं. येडीयुरप्पा सरकार हे विधानसभेत बहुमत सिद्ध करेल असा युक्तीवाद केला होता. त्यावर कोर्टाने उद्याच 4 वाजता बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यपालांनी येडीयुरप्पा यांना सत्ता स्थापनेचे आमंत्रण दिल्यानंतर काल त्यांचा शपथविधी झाला. तसंच बहुमत सिद्ध करण्यास करण्यास राज्यपालांनी येडीयुरप्पा यांना तब्बल 15 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र सुप्रिम कोर्टाच्या निर्णयामुळे राज्यपांच्या निर्णयावर चाप बसला आहे. आता उद्याच बहुमत सिद्ध करावे लागणार असल्यामुळे भाजपची गोची होण्याची शक्यता आहे.

COMMENTS