नागपूर – मंगळवारी हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस पार पडला. आजच्या दिवशीही विरोधकांनी सभागृहात मोठा गदारोळ केला. सभागृहामध्ये विरोधकांनी केलेल्या जोरदार घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज तहकूब करण्यात आलं. तर दुस-या बाजूला विरोधी पक्षांनी काढलेल्या हल्लाबोल मोर्चामुळे नागपूर शहर हादरून गेल्याचं पहायला मिळालं.
शेतकऱ्यांना कर्जमाफ झाले पाहिजे, न्याय द्या, न्याय द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, अशी कशी होत नाही घेतल्याशिवाय राहत नाही,अशा घोषणांनी सभागृहासह नागपूर शहर घोषणामय झालं होतं.
तब्बल ३२ वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी विधानभवनावर विरोधकांचा हल्लाबोल मोर्चा धडकला. शेतकरी कर्जमाफी, बोंडअळीमुळे कपाशीचे झालेले नुकसान आणि विषारी कीटकनाशकांमुळे यवतमाळ जिल्ह्यात गेलेल्या बळींच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारला नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला राष्ट्रवादी, काँग्रेसह इतर विरोधी पक्षातील असंख्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती.
COMMENTS