शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना घातला घेराव

शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्तांना घातला घेराव

मुंबई – शिवसेना आणि महापालिका आयुक्त यांच्यातील लढाई तीव्र होत असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या केबिनमध्ये जाऊन घेराव घातला. शिवसेनेला अंधारात ठेऊन आयुक्तांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबईल अँपचं लाँचिंग केल्यामुळे शिवसेना आक्रमक झाली आहे.

दरम्यान पालिका सभागृहात आयुक्तांना निवेदन करण्यासाठी येण्यास सांगूनही आयुक्त अजोय मेहता न आल्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी आयुक्त अजोय मेहता यांच्या केबिनमध्ये जाऊन  घेराव घातला.

मुबंई महापालिकेतील शिवसेनेसह काँग्रेस, सपा या पक्षाचे नगरसेवक देखील आयुक्तांविरोधात आक्रमक झाले आहेत. परंतु भाजप मात्र आयुक्तांच्या खंबीरपणे पाठिशी उभा असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता शिवसेना नगरसेवक आणि पालिका आयुक्तांमध्ये वाद रंगण्याची चिन्ह दिसत आहेत.

 

COMMENTS