“रस्ता चुकलो होतो, भाजपात 14 वर्ष वनवास भोगला !”

“रस्ता चुकलो होतो, भाजपात 14 वर्ष वनवास भोगला !”

उस्मानाबाद – रस्ता चुकलो होतो, भाजपात 14 वर्ष वनवास भोगला असून 15 व्या वर्षी स्वगृही परत आलो असल्याचं वक्तव्य रमेश कराड यांनी केलं आहे. मी जुना राष्ट्रवादीचा संस्थापक आहे. 3 वर्ष अध्यक्ष म्हणून काम केले होते असंही कराड यांनी म्हटलं आहे. आज रमेश कराड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला असून यावेळी ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , राष्ट्रवादी आमदार राणा जगजित सिंह पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रवेश केला आहे.

या पक्ष प्रवेशामुळे त्यांना विधानपरिषदेसाठी उमेदवारी देण्यात येणार आहे. आमदार दिलीपराव देशमुख यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे या ठिकाणी त्यांना उमेदवारी देण्यात येणार असून तीन टर्म दिलीपराव देशमुख यांनी ही जागा अबाधित ठेवली होती. मात्र नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी यावेळी जागा सोडण्यात आली असल्यामुळे रमेश कराड यांना याठिकाणी संधी देण्यात आली आहे.

COMMENTS