मुंबई – शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी अभिनेता शाहरुख खानला सुनावल्याचा व्हिडिओ सोशल मी़डियावर व्हायरल झाला होेता. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण दिलंय.
”मी जेव्हा अलिबागला बोटीनं जाण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाजवळ निघालो त्यावेळी तिथं प्रचंड गर्दी होती. तिथं पोलीस फौजफाटाही होता. ते तिथल्या लोकांना मागे लोटत होते. नंतर मला समजलं की, शाहरुख खान तिथल्या बोटीत बसला आहे. त्यावेळी तिथल्या पोलिसांनी मलाही मागे लोटलं. पण तेथील एका पोलिसानं मला ओळखलं आणि पुढे येण्यास सांगितलं. मी पुढे आलो तेव्हा मला शाहरुख बोटीत सिगरेट पिताना दिसला. तिथूनच तो चाहत्यांना हातही करत होता. तो तिथे जवळजवळ अर्धा तास होता. एकीकडे लोकांना बोटीनं जाण्यास उशीर होत असताना दुसरीकडे पोलीस शाहरुखला संरक्षण देण्यात व्यस्त होते. त्यामुळेच मी त्याला तिथं सुनावलं. मी स्वत: शाहरुखचा चाहता आहे. पोलीस संरक्षण देण्याबाबत माझा आक्षेप नाही. पण त्यावेळी त्याचं वर्तन चुकीचं होतं. लोकांचा खोळंबा होत होता.” असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
COMMENTS