शक्ती कायद्यांसदर्भात विविध घटकांकडून सूचना मागवल्या – देशमुख

मुंबई – महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत शक्ती कायद्याला मंजूर दिली आहे. यासाठी सर्वपक्षीय आमदारांची समिती गठीत करण्यात आली असून या कायद्यासंदर्भात जनतेकडून सूचना मागविल्या आहेत, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

देशमुख म्हणाले, संयुक्त समित्या दोन बैठका झाल्या. या बैठकीमध्ये शक्ती कायदा सक्षम होण्यासाठी महिला संघटना, सामाजिक संस्था व वकिल या घटकांकडून कायद्यासंबंधित सुधारणा व सुचना १५ जानेवारीपर्यंत मागविल्या आहेत. ११ जानेवारीला नागपूर, १९ रोजी मुंबई, २९ रोजी औरंगाबाद येथे संयुक्त समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत नामांकित महिला संघटनांना बोलवणारा आहे. त्याठिकाणी त्या आपल्या सूचना मांडणार आहेत.

COMMENTS