शरद पवारांच्या हस्ते ‘अंजीर रत्न’ पुरस्काराचे वितरण !

शरद पवारांच्या हस्ते ‘अंजीर रत्न’ पुरस्काराचे वितरण !

पुणे –  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रविवारी अंजीर रत्न पुरस्काराचे वितरण करण्यात आलं आहे. हे पीक महाराष्ट्रातील मर्यादित क्षेत्रात होतं. अंजीर पिकाचे जास्तीत जास्त उत्पादन करुन त्याची मोठ्याप्रमाणात निर्यात करणा-या शेतक-याला हा पुरस्कार दिला जातो. राज्यातील अनेक शेतक-यांना हा पुरस्कार प्रदान करण्या आला. तसेच यावेळी अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक संशोधन संघ, पुणे यांच्या परिषदेचं उद्घाटनही यावेळी करण्यात आलं.

https://twitter.com/PawarSpeaks/status/957545122530451456

 

अंजीर या पिकाला राज्यात, देशात एक वेगळं महत्त्व आहे. म्हणूनच पोषक अशा या पिकाचा अधिक विस्तार कसा होईल, त्याचा कस आणि उत्पादन कसं वाढेल याबाबत अधिक संशोधन व्हायला हवं. असं वक्तव्य त्यावेळी पवार यांनी केलं आहे. तसेच एकेकाळी अन्नधान्य आयात करणाऱ्या आपल्या देशाने धान्य व फळे निर्यात करून जगभरात एक स्थान निर्माण केलं आहे. यात सरकारच्या धोरणांइतकाच वाटा शेतात राबणारे शेतकरी व या क्षेत्रात अहोरात्र मेहनत करून संशोधन करणाऱ्या संशोधकांचा असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS