भाजपच्या मोफत पाणी योजनेचा शिवसेनेकडून भांडाफोड !

भाजपच्या मोफत पाणी योजनेचा शिवसेनेकडून भांडाफोड !

पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपनं राबविलेल्या मोफत पाणी योजनेचा शिवसेनेने भंडाफोड केला आहे. ही योजना फसवी असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. तसेच सव्वाचारशे कोटी रुपयांच्या स्थायीच्या रस्ते कामांच्या मंजुरीतील भ्रष्टाचार झाकण्यासाठी मोफत पाणी योजनेचा घाट घातला असल्याचा आरोप शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर आणि सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.

भाजपच्या या योजनेचा पाणीमीटर असलेल्या शहरातील एकाही कुटुंबाला लाभ होणार नसल्याचं शिवसेनेचं म्हणणं आहे. त्यामुळे आगामी पालिका सभेत शिवसेनेसह राष्ट्रवादीकडूनही या योजनेला कडाडून विरोध केला जाणार असल्यामुळे या योजनेचं भवितव्य टांगणीला लागलं आहे. सध्या पालिका एक ते तीस हजार लीटर पाण्यासाठी दर हजारी अडीच रुपये घेते. त्याव्यतिरिक्त कसलेही शुल्क आकारत नाही. परंतु भाजपने पिंपरीत जाहीर केलेल्या मोफत पाणी योजनेत सहा हजार लीटर पाणी मोफत दिले जाणार आहे. त्यापुढे सहा ते 15 हजार लीटरपर्यंत दरहजारी लीटरसाठी आठ रुपये, म्हणजे सध्याच्या दरापेक्षा चारपट आकारणी केली जाणार आहे. तर, 15 ते साडेबावीस हजारापर्यंत हाच दर साडेबारा रुपये आहे. त्यापासून पुढे तीस हजार लीटरपर्यंत तो वीस रुपये करण्यात आलेला आहे.

सध्या 30 हजार लीटरपर्यंत दरहजारी अडीच रुपये दर असून इतर कसलेही शुल्क नाही.मात्र, नव्या मोफत पाणी योजनेत प्रती कुटुंब शंभर रुपये शुल्क पाणीपट्टी म्हणून आकारले जाणार आहेत. मग ही योजना मोफत कशी, असा सवाल बाबर आणि भापकर यांनी केला आहे.

 

COMMENTS