उदयनराजेंना धक्का देण्यासाठी पवारांनी खेळी खेळावी, राष्ट्रवादीतील नेत्यांचा आग्रह !

उदयनराजेंना धक्का देण्यासाठी पवारांनी खेळी खेळावी, राष्ट्रवादीतील नेत्यांचा आग्रह !

सातारा – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे निवडणुकीच्या मैदानात उतरले तर आपण निवडणूक लढवणार नसल्याचं वक्तव्य माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केलं होतं. उदयनराजेंच्या वक्तव्यानंतर सातारा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीत शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवारांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवावी असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी आज दुपारी राष्ट्रवादीच्या नेत्यांची मुंबईत शरद पवारांसोबत बैठक होणार आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांसह सातारा जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकारी या बैठकीसाठी मुंबईत आले आहेत. त्यामुळे उदयनराजेंना धक्का देण्यासाठी पवारांनी खेळी खेळावी असा राष्ट्रवादीतील नेत्यांनी आग्रह केला आहे. त्यामुळे पवार आता काय निर्णय घेतली याकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान विधानसभा निवडणुकीसोबतच साताऱ्यातील लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. 21 ऑक्टोबरला सातारा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचं मतदान होणार असून विधानसभेसोबतच म्हणजेच 24 ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून माजी खासदार उदयनराजे भोसले हे उमेदवार आहेत. तर राष्ट्रवादीचा उमेदवार अजून जाहीर झाला नाही. परंतु या निवडणुकीला जर शरद पवार उभे राहिले तर मी उभा राहणार नाही. फक्त पवार साहेंबांनी त्यांचा दिल्लीतला बंगला आणि गाडी मला वापरायला द्यावी असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीत शरद पवारांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. शरद पवारांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुक लढवावी असा आग्रह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.

COMMENTS