मुंबई – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेला शब्द पाळला आहे. महाराष्ट्राच्या चार सर्वोत्तम पैलवानांना दत्तक घेण्याचा त्यांनी शब्द दिला होता. हा शब्द त्यांनी अवघ्या महिन्याभरात खरा केला असून राहुल आवारे आणि उत्कर्ष काळे या राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या पैलवानांसह महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके आणि उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्या परदेशी प्रशिक्षणाचा खर्च शरद पवारांनी उचलला आहे. या चार पैलवानांच्या खर्चासाठी त्यांनी २४ लाखांचा धनादेश दिला आहे.
काही दिवसांपूर्वीच शरद पवार यांनी या पैलवानांना दत्तक घेण्याबाबतचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर त्यांनी महिनाभरातच या चार पैलवानांना लाखोंची मदत केली आहे. २४ लाख रुपयांचे धनादेश पवार यांनी राहुल आवारे, उत्कर्ष काळे आणि किरण भगत यांचे प्रशिक्षक अर्जुनवीर काका पवार आणि अभिजीत कटकेचे प्रशिक्षक भरत म्हस्के यांच्याकडे हा धनादेश सुपूर्द केला आहे.
COMMENTS