शरद पवारांनी घेतली ‘त्या’ तरुणाची फिरकी, प्रश्नांचा भडीमार पाहून बोलतीच बंद !

शरद पवारांनी घेतली ‘त्या’ तरुणाची फिरकी, प्रश्नांचा भडीमार पाहून बोलतीच बंद !

सोलापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका तरुणाची चांगलीच फिरकी घेतली आहे. झालं असं की दुष्काळी दौय्रादरम्यान सांगोला तालुक्यातील यलमार मंगेवाडी येथे एक तरुण पवारांसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. मला कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही असं गाऱ्हाणं तो मांडत होता. हा तरुण  हातात घड्याळ आणि गाडीची चावी कमरेला लावून आला होता. त्याला पाहून शरद पवारांनी या तरुणाची चांगलीच फिरकी  घेतली. “चावी  कशाची आहे, कोणत्या गाडीची आहे? घड्याळ कुठल्या कंपनीचं आहे?” अशा प्रश्नांची सरबत्ती पवारांनी त्याच्यावर केली.  हा तरुण बुलेटवरुन आला होता. पवारांनी प्रश्नांचा भडीमार केल्यावर तरुणाची बोलतीच बंद झाली असल्याचं पहावयास मिळाले.

दरम्यान शरद पवार हे कालपासून दुष्काळी दौय्रावर आहेत. काल मुंबईत मतदान केल्यानंतर शरद पवार थेट सोलापूरला रवाना झाले. यावेळी त्यांनी चारा छावणीतील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दुष्काळाची तीव्रता जाणून घेतली. यावेळी एका शेतकऱ्याने तक्रार केली, फक्त पाच जनावरांना छावणीत प्रवेश आहे, सरसकट जनावरांना प्रवेश मिळावा, अशी विनंती शेतकऱ्याने केली.

COMMENTS